school4all.org – शाळांसाठी नवे ऑनलाईन व्यासपीठ

भारत सरकारच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ योजनेस मदत म्हणून ज्ञानदीप फौंडेशनने www.school4all.org हे संकेतस्थळ २००६मध्ये सुरू केले. त्यवेळी फक्त विज्ञान विषयाच्या शिक्षकांना संगणकाची माहिती होती.

आज कोणत्याही विषयासाठी आता  संगणक आणि इंटरनेट वापराचे ज्ञान अनिवार्य झाले आहे. मात्र अजूनही भारतात पूर्वीचीच पुस्तकी शिक्षणव्यवस्था वापरली जाते. त्यातील ज्ञान केव्हाच कालबाह्य झाले आहे.

आता नव्या औद्योगिक डिजिटल क्रातीमुळे संगणक तंत्रज्ञानावर आधारित नव्या सुविधांचे शिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना देणे आवश्यक झाले आहे.

अमेरिकेतील प्रगत शिक्षणव्यवस्थेवर आधारित शिक्षण मराठीतून सर्व शाळांना देता यावे यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने  अटल टिंकरिंग लॅबसारखीच अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली असून या वेबसाईटवरून त्याचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेत सहभागी होणा-या शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांचा गट करून त्याना एक प्रयोगसंच दिला जाईल आणि एक पाच पानांची शाळेची वेबसाईट य़ा वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. या ऑनलाईन सुविधेमुळे विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थी एकत्र शिक्षण, संशोधन आणि विकासप्रकल्प करू शकतील.

विद्यार्थ्यांनाना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येईल. शिक्षक व उद्योग व्यवसायातील तज्ज्ञ यांना मार्गदर्शन करता येईल व आपले शिक्षण जागतिक दर्जाचे होईल.

सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे भारतातील शिक्षक, विद्यार्थी आणि प्रगत राष्ट्रांतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यात परस्पर संवाद व ज्ञानाची देवघेव होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *